स्वत:चा फॉर्म पाहून चकित झाला एबी डिव्हिलियर्स, केले असे विधान

AB de Villiers

हैदराबाद संघाविरूद्ध एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers)  ३० चेंडूंत ५१ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीने ५ विकेट्सवर १६३ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एबी डिविलियर्स (AB de Villiers) म्हणाला की, ५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो स्वत: अशा फॉर्ममुळे आश्चर्यचकित झाला. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने ३० चेंडूंत ५१ धावा केल्या ज्यामुळे आरसीबीने ५ विकेट्सवर १६३ धावा जोडले. डीव्हिलियर्स म्हणाला, ‘मी स्वत:च आश्चर्यचकित झालो आहे. दक्षिण आफ्रिकेत आम्ही एक स्पर्धात्मक सामना खेळला ज्यामुळे काहीसा आत्मविश्वास आला.

तो म्हणाला, ‘एक ३६ वर्षाचा खेळाडू, ज्याने ५-६ महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळलेला नाही, जर तो तरुणांमधे येऊन अश्या प्रकारे खेळत असेल तर ही चांगली सुरुवात आहे. मूलभूत गोष्टींवर चिकटून रहायला आनंद झाला. “तो खूप लाजाळू आणि कमी बोलणारा मुलगा आहे” असे सांगत त्याने आयपीएल सामन्यात अर्धशतक झळकाविलेल्या देवदत्त पडिक्कलचे (Devdutt Padikkal) कौतुक केले. तो खूप कुशल आहे आणि मला काही बोलण्याची गरज नाही. ‘

विशेष म्हणजे आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात आरसीबी संघाने सनरायझर्स हैदराबादला १० धावांनी पराभूत केले. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स आणि देवदत्त पडिक्कल यांनी त्यांच्या फलंदाजीने संघाला आवश्यक धावा दिल्या. डीव्हिलियर्स अनेक सीझनपासून आरसीबीशी संबंधित आहे. यावर्षीही क्रिकेट चाहत्यांना ‘मिस्टर ३६० डिग्री’ पासून मोठ्या आशा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER