आता अपेक्षा फिनिक्ससारख्या भरारीची….

Shailendra Paranjapeपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं वीस लाख कोटी रुपयांचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलेला या पॅकेजचा तपशील लक्षात घेतला तर करोनाच्या संकटाचं संधीत रूपांतर होऊ शकतं, याचा अंदाज येईल. करोनामुळं चीनकडं सारं जग शंकेनं बघत असताना पंतप्रधानांनी एकाच भाषणात तीन-चार उद्दिष्टं सफल केली आहेत. त्यामुळं आता लॉक डाऊन ४ची प्रतीक्षा करत असताना आणि त्याची वेळ तीन-चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना वीस लाख कोटींच्या पॅकेजमुळं करोना भयग्रस्ततेतून मोठाच दिलासा मिळाला आहे.

आता १७मे या दिवशीनंतर जोकाही चौथा लॉक डाऊन येईल तो विविध राज्यांकडून येणाऱ्या प्रस्तावांनुसार अवलंबला जाणार आहे. तो अमलात आणताना अर्थातच थिंक ग्लोबली, अँक्ट लोकली…हा नवा मंत्र असेल. कदाचित करोनोत्तर काळात चीनमधून बाहेर डणारी गुंतवणूक आकर्,त करून घ्यायला सर्वच राज्यांनी स्पर्धात्मक रहावं, तसंच आपापल्या राज्यातली करोना स्थिती हळूहळू पण सातत्यपूर्ण रीतीने नियंत्रणात आणावी, त्यासाठी स्थानिक पातळीवरप्रभावी उपाय योजावेत, ही मुभा सर्वच राज्यांना दिली जाईल.

ही बातमी पण वाचा : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सूक्ष्म लघु उद्योग आणि कर्मचाऱ्यांना दिलासा

वीस लाख कोटीचं पॅकेज येतानाच कंपनी कायदे, कामगार कायदे यामधेही लाल फितीचा कारभार टाळण्यासाठी आणि टाळेबंदी वा लॉकडाऊन उठल्यानंतर देशात, विविध राज्यात आणि स्थानिक पातळीवर म्हणजे पुण्यासारख्या भागात गुंतवणूकदृष्ट्या तसंच करोना भयमुक्ततेसाठीही स्थानिक उपाययोजनाच प्रभावी ठरणार आहे. एकीकडे बंद असलेली इंडस्ट्री वा उद्योगविश्व पुन्हा जोमानं उभं रहाणं, त्यातून अर्थव्यवस्थेचं चक्र वेगवान करणं, त्यासाठी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशी ब्रॅण्ड्सचा आग्रह धरणं, ते विकसित करणं हा राष्ट्रीय पातळीवरचा आग्रह असताना स्थानिक पातळीवर पुण्यातून जगाच्या बाजारपेठेत नावलिक मिळवलेलं अत्यंत कुशल मनुष्यबळ मग ते संगणकप्रणाली क्षेत्रातलं असो की वाहन उद्योगातलं, पुण्यानं करोनामधून फिनिक्स पक्ष्याप्रमाणं उभं रहायला हवं.

ही बातमी पण वाचा : लोकल ब्रॅण्ड्सना ग्लोबल बनवण्याचं लक्ष्य- निर्मला सीतारामन

राष्ट्रीय पातळीवर करोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ३२ टक्केवर जात असताना पुण्यातही पूर्व भागातून करोनाची लवकरात लवकर हकालपट्टी करायला हवी. त्याबरोबरच सामान्य जनजीवन सुरळीत होतानाच शैक्षणिक, औद्योगिक पातळीवर अल्पावधीत वेगानं प्रगती साधायला हवी, तरच गो करोना बरोबरच कम प्रॉस्पेरिटी असंही म्हणता येईल.

पंतप्रधान मोदींचा संकटाचं संधीत रूपांतर करण्याचा सल्ला, अर्थमंत्र्यांनी एकूणच अर्थव्यवस्थेला दिलेला बूस्टर डोस, यातून आता पुण्यानं आपलं स्थान केवळ राज्य पातळीवर वा देश पातळीवरच नव्हे तर जगाची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून युरोपियन राष्ट्रांशी स्पर्धा करत व्यवसायाच्या संधी शोधण्याची गरज आहे. वस्त्रोद्योगापासून संरक्षण, अवकाशसंशोधन, वकिली व्यवसाय आणि आर्बिट्रेटर्स, संगणकप्रणाली तज्ज्ञ, ग्रामोद्योग, पर्यटनदृष्ट्या संपन्न समुद्र किनारा आणि कोकणासह शिवछत्रपतींचे किल्ले या सर्व गोष्टींचा फायदा महाराष्ट्रानं उठवायला हवा. महाराष्ट्रानं आणि पुण्यासह विविध शहरांनी देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर आपलं नावं ठळकपणे समोर येईल आणि करोनापूर्वीच्या पेक्षा करोनोत्तर काळ अधिक स्वर्णिम ठरवावा, तरच वीस लाख कोटीचं पॅकेज सार्थकी लागेल.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेज अभूतपूर्व, ऐतिहासिक!  : देवेंद्र फडणवीस 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला