शिक्षणमंत्री आशिष शेलार उत्तीर्ण; २५ हजार ९०० हून अधिक मतांनी विजय

Ashish Shelar

मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. त्यांचा २५ हजार ९०० हून अधिक मतांनी विजय झाला आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

आशिष शेलार यांच्याविरोधात केवळ तीनच उमेदवार होते. काँग्रेसचे आसिफ जकेरिया शेलारांना कडवी झुंज देतील, असे मानले जात होते.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९