सरकारला सळो की पळो करून सोडणार – आशिष शेलार

Aashish Shelar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला  आजपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जावे लागले. यावेळी राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस आक्रमक; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी

भाजप नेते आशिष शेलार यांनीही सरकारवर निशाणा साधला. ठाकरे सरकारने  शेतकऱ्याची दुर्दैवाने चेष्टा केली आहे. कर्जमाफीची पहिली यादी जरी सरकार जाहीर करत असले तरी प्रत्यक्षात ती समोर आल्यावरच कळेल. त्यामुळे भाजप शेवटपर्यंत शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार आणि विविध घटनांवर आवाज उचलत सरकारला सळो की पळो अशी भूमिका घेणार असल्याचे शेलार म्हणाले.

दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याची व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.


Web Title : Ashish Shelar Latest Marathi News on Shivsena

Maharashtra News : Latest Mumbai News only on Maharashtra Today