आरोहला मिळाली दिवाळीची डबल गिफ्ट

Aaroh Welankar And Wife

घरामध्ये येणाऱ्या नव्या छोट्याशा पाहुण्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. लग्नानंतर जेव्हा छोटे बाळ येण्याची चाहूल लागते तेव्हा सगळं घर आनंदून जातं. त्यात जर हा आनंद दिवाळीमध्ये मिळाला तर सोने पे सुहागा. अभिनेता आरोह वेलणकर (Aaroh Welankar) याला त्याच्या पत्नी अंकिता (Ankita Welankar) हिने आता त्यांच्या दोघांच्या आयुष्यात एक तिसरा छोटासा पाहुणा येणार असल्याची बातमी दिवाळीमध्येच दिल्यामुळे आरोहला दिवाळीमध्ये आनंदाची बंपर गिफ्ट मिळाली आहे. पुढच्या वर्षी आरोह आणि अंकिता यांच्या

आयुष्यात नवं बाळ येणार आहे. तू मला दिवाळीची खुप छान गिफ्ट दिली असं म्हणत आरोहने अंकिताच्या पोटावर हात ठेवलेला खास फोटो त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

लाडाची मी लेक ग या मालिकेतून आरोह सध्या घराघरात पोहोचला आहे. मिताली मयेकर आणि आरोह वेलणकर यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. डॉन असलेल्या आई-वडिलांचा डॉक्टर मुलगा अशी व्यक्तिरेखा या मालिकेमध्ये आरोह साकारत आहे. या सिनेमातून आरोहने मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. चांगल्या घरातील मुले गुन्हेगारीकडे कशा पद्धतीने बघतात आणि मग त्यांचं आयुष्य वाममार्गाला कसे लागते या विषयावर बेतलेल्या रेगे या सिनेमात आरोहने केलेल्या भूमिकचे विशेष कौतुक झालं होतं.

मध्यंतरीच्या काळामध्ये आरोह मात्र छोट्या पडद्यापासून लांब होता काही जाहिराती आणि वेब सिरिजमध्ये आरोह बिझी होता. मात्र सध्या लाडाची मी लेक ग या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरोह छोट्या पडद्यावर आला आहे.

अंकिता शिंगवी सोबत आरोहचे लग्न झाले असून अंकिता गुजराती असल्यामुळे आरोहने महाराष्ट्रीय आणि गुजरती या दोन्ही पद्धतीने लग्न केले आहे. सेलिब्रेटी कलाकारांना त्यांनी शेअर केलेला फोटोवरून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकासाठी जो लूक केला जातो त्यावरुन मध्यंतरी सोशल मीडियावर ट्रोल केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कलाकार खूप डिस्टर्ब झाले होते आणि याच मुद्द्यावर आरोह सोशल मीडियावर व्यक्त देखील झाला होता. कलाकारांना त्यांचे व्यक्तिगत आयुष्य जगू द्या. त्यांनी कुठले कपडे घालायचे आणि कसे फोटो शेयर करायचे यावर नेटकरी यांनी कंट्रोल ठेवू नये आणि त्यांना ट्रॉलही करू नये ही आरोह वेलणकरची कमेंट देखील सोशल मीडिया आणि इंटरनेटवर खूप गाजली होती.

दोन दिवसापूर्वीच आरोहने सोशल मीडिया पेजवर पत्नी अंकिताच्या पोटावर हात ठेवलेला फोटो टाकला होता आणि त्यासोबत तू मला दिवाळीची खूप छान गिफ्ट दिली आहेस अशी कॅप्शन लक्ष वेधून घेत होती. कुणीतरी येणार गं असं अशी ओळही आरोने या फोटोसोबत लिहिल्याने या फोटोचा नेमका अर्थ चाहत्यांना देखील कळला. सध्या या फोटोवरून आरोहला खूप सार्‍या कमेंट येत आहेत. तसेच आरोह आणि अंकिता चे अभिनंदन देखील त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. अंकिता आई होणार असल्याची बातमी अंकिताने दिवाळीतच आरोहला दिल्यामुळे तो जास्त खुश आहे .आरोहच्या घरात दिवाळीची धामधूम सुरू होती. सगळ्या घराला रोषणाई केली होती. दारात रांगोळी काढण्यात आली होती आणि अशा दिवाळीच्या वातावरणात अंकिता आई होणार असल्याचे समजल्यामुळे या दोघांच्या आयुष्यात एक वेगळाच लख्ख प्रकाश पडला. सगळ्यात जास्त आनंद याचा झाला की सध्या लाडाची मी लेक ग या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. आणि याच यशाच्या वातावरणामध्ये अंकिताने त्याला ही गोड बातमी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER