अजनी येथील वृक्षांची कत्तल करण्याविरोधात ‘आप’चे चिपको आंदोलन

Ajni - AAP - Chipko movement
Ajni - AAP - Chipko movement

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अजनी परिसरात जागतिक दर्जाचे इंटरमॉडेल स्टेशन उभारण्यात येणार असून, प्रकल्पासाठी ४५०० वर झाडे ताेडण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीच्या विरोधात आज आप (AAP) पक्षाच्यावतीने चिपको आंदोलन (Chipko Movement) करण्यात आले.

२०१९ मध्ये इस्रोच्या आरसीसीने एक अहवाल दिला आहे, ज्यात असे म्हटले आहे की, नागपूरमध्ये गेल्या काही दशकांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त हिरवे आवरण, एक तृतीयांश टक्के गमावले गेले आहे. हे चिंताजनक आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडल्यामुळे हिरव्या आवरणात अधिक घट होईल. आयएमएस फेज-१ मधील ४५२२ वृक्ष कापण्याचा तपशील चुकीचा असून अजनी, एफसीआय आणि इरिगेशन विभाग मिळून एकूण लहान-मोठी जवळपास ४५०० झाडे कापली जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड म्हणजे न भरून निघणारी पर्यावरणाची हानी आहे. हा प्रकल्प एक लक्झरी प्रकल्प आहे जो स्थलांतरित केला जाऊ शकतो किंवा वृक्षतोड न करतासुद्धा प्रकल्प उभा होऊ शकतो; परंतु ही वृक्षतोड किंवा झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे सर्व अनुभव अयशस्वी ठरल्यामुळे झाडांचे प्रत्यारोपण केले जाऊ शकत नाही. तसेच नवीन वृक्षारोपणसुद्धा कागदावरच राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे याचाही फारसा उपयोग होणार नाही किंवा जुन्या कापलेल्या झाडांची जागा घेऊ शकत नाही.

ही झाडे पक्ष्यांसाठी अधिवास आहेत आणि सूक्ष्म हवामानावर नियंत्रण करतात. त्यांना कापल्यास पक्ष्यांची घरटी, कीटक नष्ट होतील, जे तसेच जैवविविधतेच्या आवश्यक भागांचे परागण करण्यास उपयुक्त आहेत. तसेच हा प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी पर्यावरण मंजुरी घेतली गेली नाही. एकूणच वरील बाबींचा विचार केला असता करदात्यांच्या रकमेतून होत असणाऱ्या अशा प्रकारच्या ‘पायाभूत विकासा’मुळे जगण्याच्या मूलभूत सुविधांपासून (हवा आणि पाणी) वंचित राहण्याची किंमत नागपूरकरांना मोजावी लागेल. त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की, हा प्रकल्प मिहानमध्ये किंवा शहराच्या बाहेर उभारण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button