महापालिका पोटनिवडणूकीत भाजपाचा सूफडा साफ, ‘आप’ ४ जागांनी विजयी

Arvind Kejriwal

नवी दिल्ली :- गुजरातमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, दिल्लीतील महापालिकेच्या ५ वार्डात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ झाला.५ पैकी ४ जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला. तर एका ठिकाणी काँग्रेसला यश आले. ‘आप’च्या या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आनंद व्यक्त केला.

त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली. २८ फेब्रुवारीला महापालिकेच्या वार्डातील ५ जागांसाठी निवडणूक झाली होती. यात, ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यापूर्वी पोटनिवडणूक झालेल्या ५ पैकी ४ जागांवर आम आदमी पक्षाचेच नगरसेवक होते, तर, एका जागेवर भाजपाचा नगरसेवक होता.

दिल्लीतील लोकांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर ५ पैकी ४ उमेदवार निवडून विश्वास दाखविला आहे. १५ वर्षांपासूनच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात जनता त्रासली आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवून भाजपाचा सूफडा साफ करेल, असे मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या १५ वर्षात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाचा कधीही पराभव झाला नाही. त्यामुळे, ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची होती. जनतेने २०२२ च्या निवडणुकांसाठी हा संदेश दिला आहे, असे आम आदमी पक्षाचे महापालिका निवडणूक प्रभारी दुर्गेश पाठक यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER