आपचे आमदार सोमनाथ भारतींची २ वर्षांची शिक्षा कायम

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे या गुन्ह्यात दिल्लीचे माजी कायदा मंत्री आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांना सुनावण्यात आलेली २ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे.

आरोप

सोमनाथ भारतींवर दंगल करणे, लोकांना बेकायदेशीरपणे जमवणे आणि ‘प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी’ कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे असे गंभीर आरोप आहेत.

भारती यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावल्या शिक्षेला त्यांनी राऊज एव्हेन्यू कोर्टात आव्हान दिले होते. न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवण्याला भारती यांनी आता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

आमदारकी जाणार?

उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवल्यास सोमनाथ भारती त्यांची आमदारकीही जाऊ शकते. तसेच पुढील 6 वर्षे त्यांना निवडणूक लढण्यासही बंदी घातली जाऊ शकते.

मंगळवारी (२३ मार्च) रोजी दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने भारती यांना तुरुंगात पाठवले होते. सोमनाथ भारती यांनी २०१६ ला मध्ये एम्स रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना २३ जानेवारी रोजी दोषी ठरवण्यात आले आणि २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER