‘आप लोगन से बिनती करात बा’; उत्तर भारतीयांसाठी मनसेचे भोजपुरी बॅनर्स

MNS - Banner - Maharastra Today

मुंबई : काही वर्षांपूर्बी उत्तरभारतीयांविरुद्ध आंदोलने करणारी मनसे आता मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांना साद घालते आहे. या आंदोलनात मनसेने उत्तर भारतीयांवर हल्ले देखील केले होते. मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरीत बॅनर्स लावले आहेत.

कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्समधून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जय श्री राम … हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, अशी घोषणा मनसेने दिली आहे. .

काही दिवसांपूर्वीच मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झाली होती. यानंतर घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आवाहन करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेत बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

मनसेचे बॅनर्स

जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा, हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देई …..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER