महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी : अण्णा हजारे

Anna Hazare-MVA Govt

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hazare) यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहे . महाविकास आघाडीचं सरकार (MVA govt)म्हणजे चलती का नाम गाडी आहे. थांबला तर खटारा, अशी जोरदार टीका अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारवर केली.

अण्णा हजारे म्हणाले, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा असून या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला. यासाठी मी या सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली होती. परंतु मुख्यमंत्री सोडून मला इतर कुणाचंही उत्तर आलं नाही . मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये या कायद्यासंदर्भात कोरोना परिस्थितीनंतर पाहू असं म्हटलं.

हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार, असा इशारादेखील अण्णांनी दिला . दरम्यान चित्रपटगृह उघडली, रेल्वे सुरू केली; पण मंदिर का उघडली नाहीत? असा सवालंही अण्णांनी सरकारला विचारला.

ही बातमी पण वाचा : ‘अर्णब’ छाप वृत्तपत्र स्वातंत्र्य! वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले – संजय राऊत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER