आमिरचा मुलगा जुनैद बनणार ‘महाराजा’

Aamir Khan - Junaid Khan

बॉलिवुडमध्ये (Bollywood) स्टार सन्सची कमी नाही. अगदी पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचा मुलगा राज कपूर (Raj Kapoor) ते सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओलपर्यंत अनेक स्टार सन्सनी बॉलिवुडमध्ये प्रवेश करून करिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काही जण यशस्वी झाले तर काही जण अयशस्वी. पिता बॉलिवुडमधील मोठे नाव असल्याने या स्टार सन्सची एंट्री तर झोकात होते पण नंतर त्यांना स्वतःच्या बळावरच यश मिळवावे लागते. अनेक स्टार सन्स नंतर बॉलिवुडच्या बाहेरही फेकले गेले आहेत. असे असले तरी स्टार सन्सचे रुपेरी पडद्यावर आगमन होण्याची परंपरा कायम राहिली आहे. या स्टार सन्सच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार असून तो ‘महाराजा’ बनून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा स्टार सन आहे जुनैद (Junaid Khan) जो प्रख्यात अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा आहे.

आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची पत्नी सुनिता यांचा मुलगा जुनैद बॉलिवुडमध्ये येणार अशा चर्चा गेल्या एक-दोन वर्षांपासून सुरु आहेत. पित्याप्रमाणे जुनैदलाही बॉलिवुडमध्ये यश मिळवायचे आहे. त्याने अभिनयाची सुरुवात रंगमंचापासून केली. सिनेमासाठीही त्याने अनेकदा ऑडिशन दिल्या पण त्यात तो पास झाला नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आता त्याला यश मिळवून देण्यासाठी यशराज बॅनरच पुढे आल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशराज फिल्म्स जुनैदला घेऊन एक पीरियड सिनेमा तयार करण्याची योजना आखत आहे. यशराजसाठी राणी मुखर्जी (Rani Mukherjee) अभिनीत हिचकी सिनेमाचे दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) जुुनैदच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून या सिनेमाचे नाव महाराजा ठेवण्यात येणार आहे.

1862 मध्ये होऊन गेलेल्या एका प्रख्यात बाबाच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असून ही एक सत्य कथा असणार आहे. हा पाखंडी बाबा एका प्रख्यात पत्रकार आणि समाजसेवकावर बाबाचा संप्रदाय बदनाम करण्याचा आरोप ठेवतो असे हे कथानक आहे. या पत्रकाराचे नाव करसनदास मुलजी असून या पत्रकाराची भूमिका जुनैद करणार असल्याचे सांगितले जात आहे. बाबाची भूमिका ‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावत करणार आहे. या बाबाचे नाव जादूनाथजी बृजनाथजी महाराज असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER