आमिरची मुलगी इराचे बिकिनी फोटो झाले प्रचंड व्हायरल

Aamir Khan - Ira Khan

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची (Aamir Khan) बॉलीवुडमध्ये (Bollywood) ओळख आहे. अत्यंत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक आमिर खान गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांची निवड करीत आला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आमिरचे फॅन्स आहेत. आमिरसोबतच त्याची मुलगी इराचेही (Ira Khan) फॅन्स जगभरात पसरलेले आहेत. इराने अजून बॉलिवुडमध्ये पाऊल टाकलेले नसले तरी की सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आताही इराने बिकीनीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे. आमिरच्या मुलीचे हे रूप पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

इरा खान सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत असते आणि त्या पोस्टमुळे ती नेहमी चर्चेत राहात असते. काही दिवसांपूर्वी लहानपणी तिच्याशी लैंगिक गैरवर्तणूक झाल्याची पोस्ट टाकली होती. तिच्या या रहस्योद्घटनाने प्रचंड खळबळ माजली होती. आणि आता इराने बिकीनीतील फोटो टाकून खळबळ माजवली आहे. हा फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडला असून ते प्रतिक्रियाही देत आहेत. स्विमींग पुलाजवळ उभी असलेल्या इराने पिवळ्या रंगाची बिकीनी आणि काळ्या रंगाची शॉर्टस घातल्याचे फोटोत दिसत आहे. तिचे हे नवे रूप खूपच आकर्षक दिसत आहे.

इराने या फोटोसोबत लिहिले आहे, ‘मला अजून खूप काही करायचे आहे. माझ्या फॅन्ससाठी मी सोशल मीडियावर काही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या मी वेळोवेळी पूर्ण करीन. परंतु कधी कधी जीवनात एखादा ब्रेक घेणे गरजेचे असते. आणि त्यावेळी स्वतःशी केलेल्या कमिटमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आता कामावर परत आली आहे. माझी वाट पाहत राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER