आमिरने सोशल मीडियाला केला राम राम, फक्त स्वतःच्या कंपनीचे सोशल अकाउंटच वापरणार

Aamir Khan

आमिर खान (Aamir Khan) सध्या लाल सिंह चड्ढाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. आमिर जेव्हा एखादा प्रोजेक्ट हाती घेतो तेव्हा तो प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा म्हणून तो त्यात सर्वस्व ओततो. मोबाईलमुळे कामात अडथळे येत असल्याने त्याने मोबाईलपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला होता. आमिरने आता तर सोशल मीडियालाही राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरनेच सोशल मीडियावरील त्याच्या अकाउंटवर ही माहिती दिली आहे. तसे पाहिले तर आमिर दुसऱ्या कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसतो, तरीही त्याने आता सोशल मीडियापासून दूर राहाण्याचे ठरवले आहे.

आमिर खानने रविवारी १४ मार्च रोजी ५६ वा वाढदिवस साजरा केला. १४ मार्च रोजीच आमिरच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजचा पाऊस पडला. गुलशन ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, दिव्या दत्ता, सचिन तेंडुलकर, एली एवराम, गीता फोगट, दलेर मेहंदी, युवराज सिंह अशा बॉलिवूडसह समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्याच्या फॅन्सचाही समावेश आहे. रविवारी या सगळ्यांच्या पोस्टला उत्तर देऊन आभार मानण्यास वेळ न मिळ्ल्याने त्याने काल म्हणजे सोमवारी सगळ्यांचे आभार मानले. मात्र यासोबतच त्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली.

या पोस्टमध्ये माझी ही शेवटची पोस्ट असल्याचे त्याने म्हटले आहे. पण सोशल मीडिया का सोडतोय हे मात्र त्याने सांगितले नाही. मात्र त्याने त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून फॅन्सच्या संपर्कात राहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आमिरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘मित्राने, माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेम आणि आपलेपणाबाबत खूप खूप आभार. माझे मन भरून आले आहे. दूसरी बातमी द्यायची झाली तर सोशल मीडियावर ही माझी शेवटची पोस्ट आहे. सोशल मीडियावर मी जास्त सक्रिय नसतो, पण पण आता मी बहानेबाजी सोडण्याचे ठरवले आहे. आपण पूर्वीप्रमाणेच एकमेकांशी संवाद साधू. पण यासाठी मी माझ्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करणार आहे. आमिर ख़ान प्रोडक्शन्सने स्वचःचे चॅनल सुरु केले असून या चॅनेलवरच तुम्हाला माझ्या आणि माझ्या सिनेमाबाबतची माहिती मिळेल. यासोबत आमिरने त्याच्या कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटची माहितीही दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER