आमिर खानच्या मुलीचे वयाच्या चौदाव्या वर्षी झाले होते लैंगिक शोषण

Aamir Khan

लहान मुलींचे नात्यातील किंवा ओळखीच्या माणसाकडूनच लैंगिक शोषण झाल्याच्या घटना आपण नेहमी वाचत असतो. ओळखीचा माणूस असल्याने कधी कधी मुली गप्प राहातात तर कधी त्यांना धमकावले असल्याने त्या निमूटपणे लैंगिक शोषण सहन करतात. काही अभिनेत्रींनी लहानपणी त्यांच्याशी झालेल्या लैंगिक शोषणाचे काही किस्से समोर आले होते. परंतु आता तर आमिर खानच्या (Aamir Khan) मुलीने इरानेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले आहे. इरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिने एक व्हिडियो सोशल माडियावर टाकत याबाबत खुलेपणाने वक्तव्य केले आहे. इराच्या या गौप्यस्फोटाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) चांगलीच खळबळ माजलेली आहे.

इरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी सुनीता यांची मुलगी. आमिर खानने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर किरण रावबरोबर लग्न केले आहे. इराने सोशल मीडियावर टाकलेल्या 10 मिनिटाच्या व्हीडियोमध्ये लैंगिक शोषणासोबतच आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबतही वक्तव्य केले आहे. इराने व्हिडियोत म्हटले आहे, जेव्हा मी 14 वर्षांची होते तेव्हा माझे लैंगिक शोषण करण्यात आले होते. माझे लैंगिक शोषण केले तेव्हा मी हे समजू शकले नाही की त्या व्यक्तीने माझ्यासोबत काय केले हे त्याला समजले की नाही. यावर कसा विश्वास ठेवावा हेच मला कळत नव्हते. त्या व्यक्तीला त्याच्या या कृत्याची खरी माहिती आहे की नाही हे समजायला मला एक वर्ष लागले. माझ्याशी जेव्हा लैंगिक वर्तन झाले तेव्हा मी लगेचच माझ्या आई-वडिलांना एका ईमेलद्वारे ही संपूर्ण घटना कळवली. त्या घटनेतून मी स्वतःच स्वतःला बाहेर काढले असेही इराने या व्हीडियोत म्हटले आहे.

इरा ने आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलताना म्हटले आहे की, मी दुःखी का आहे हेच मला कळत नव्हते. माझ्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला तेव्हा मी लहान होते. त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला होता त्यामुळे कोणालाही तसा धक्का बसला नाही. घटस्फोटानंतरही दोघे एकमेकांचे मित्र होते. आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही. माझ्या आणि भाऊ जुनैदबाबतचे सर्व निर्णय एकत्र मिळून घेत असत. तसेच मी काही कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती असेही इराने या व्हीडियोत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER