राजामौलीच्या बहुचर्चित ऐतिहासिक आरआरआरला आवाज देणार आमिर खान

S. S. Rajamouli - Aamir Khan

साऊथचा प्रख्यात यशस्वी दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) एक भव्य असा ऐतिहासिक चित्रपट आरआरआर तयार करीत आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात साऊथ आणि बॉलिवुडमधील (Bollywood) मोठे नामवंत कलाकार काम करीत आहेत. या चित्रपटाशी आता आमिर खानचेही (Aamir Khan) नाव जोडले जाणार आहे. मात्र तो या चित्रपटात काम करणार नसून व्हॉईसओव्हर करणार आहे.

तब्बल 400 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या राजामौलीच्या या चित्रपटात ज्यूनियर एन‍टीआर आणि रामचरण यांच्यासोबत अजय देवगण आणि आलिया भट्टही काम करीत आहेत. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून यात प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीताराम राजू यांची जीवनगाथा मांडण्यात येत आहे. या चित्रपटात हॉलिवुडचेही कलाकार काम करीत आहेत. खरे तर यावर्षीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याचा राजामौलीचा विचार होता. परंतु कोरोनामुळे आठ महिन्यांपासून चित्रपटाचे शूटिंगच होऊ शकले नव्हते. मात्र आता या चित्रपटाचे पुन्हा शूटिंग सुरु करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजामौलीला असा एक मोठा कलाकार हवा होता जो चित्रपटातील कलाकारांची प्रेक्षकांना ओळख करून दिली. मात्र तो सूत्रधाराप्रमाणे चित्रपटाते कथानक पुढे नेणारा नसेल तर फक्त कलाकारांची ओळख करून देईल. यासाठी राजामौलीने आमिर खानला विचारले असता तो लगेचच तयार झाल्याचे सांगितले जाते.

केवळ चित्रपटातच कलाकारांची ओळख आमिर खान करून देणार नसून चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही आमिर खानचा आवाज वापरला जाणार आहे. ट्रेलरमध्ये आमिर खान चित्रपटातील या दोन स्वातंत्र्यता सेनानींची ओळख प्रेक्षकांना करून देणार आहे. हा चित्रपटात दोन-तीन नव्हे तर चक्क जगातील दहा भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER