‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होईपर्यंतम सोशल मीडियापासून दूर राहाणार आमिर खान

Lal Singh Chaddha - Aamir Khan

सोशल मीडियाने (Social Media) लोकांना अक्षरशः वेड लावलेले आहे. जवळ जवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांचे अकाउंटही आहेत. एक अकाउंट चेक करून झाले की, लगेचच दुसरे अकाउंट चेक करतात. तसेच प्रत्येक अकाउंटवर मेसेजही पोस्ट करीत असतात. प्रत्येकाचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावरील अकाउंट चेक करण्यातच जातो. बॉलिवूडचे (Bollywood) कलाकार तर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांच्या प्रत्येक गोष्टीची माहिती फॅन्सना देत असतात. या कलाकारांच्या रोज येणाऱ्या पोस्ट पाहिल्या की त्यांना पोस्ट टाकण्यास वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण या कलाकारांची सोशल मीडिया अकाउंट पाहाणारी एक टीम असते आणि तीच हे सर्व काम करीत असते. आमिर खान (Aamir Khan) सोशल मीडियावर तसा जास्त सक्रिय नसतो. तो स्वतःचा नंबर किंवा सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिकही करीत नाही. तरीही सोशल मीडियामुळे त्याला कामात व्यत्यय येत असल्याने आता त्याने ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) रिलीज होईपर्यंत सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हॉलिवूडच्या सुपरहिट आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ सिनेमाची हिंदी रिमेक आहे. शूटिंग पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे. आमिर त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या वेळी कथेपासून रिलीजच्या योजना, पब्लिसिटीपर्यंत सर्व गोष्टी स्वतः बसून फायनल करतो. आताही तो लाल सिंह चड्ढाच्या पोस्ट प्रॉडक्शन आणि पब्लिसिटीवर काम करीत आहे. मात्र हे काम करीत असताना त्याला मोबाईलचा त्रास होत आहे. काम सुरु असताना सोशल मीडियावर काही तरी मेसेज येतो किंवा कोणी तरी फोन करतो त्यामुळे आमिर डिस्टर्ब होतो. त्यामुळेच आमिरने या सिनेमाचे सर्व काम पूर्ण होईपर्यंत सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्याच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिली. अर्जंट काम असेल तर लँड लाईनवर फोन करण्याचे निर्देश त्याने दिल्याचे म्हटले जात आहे.

आमिरचा हा सिनेमा खरे तर गेल्या वर्षी ख्रिसमसला रिलीज करण्याची योजना आखण्यात आली होती. पण कोरोनामुळे शूटिंग होऊ शकले नाही आणि सिनेमा पुढे ढकलावा लागला. शूटिंगला परवानगी मिळाल्यानंतर आमिरने लगेचच शूटिंग पूर्ण करून टाकले. खरे तर आमिर असे फटाफट काम करीत नाही पण करीना कपूरही गरोदर असल्याने आणि लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याने आमिरने करीनाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करून टाकले. सिनेमा आता पूर्ण झाला असला तरी त्याने तो यंदाच्या ख्रिसमसलाच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जवळ जवळ वर्षभर तो पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात बिझी राहाणार आहे. आमिर त्याचा हा सिनेमा मुकेश अंबानीची कंपनी व्हायकॉम 18 सोबत तयार करीत आहे. व्हॉयकॉमही हा सिनेमा भव्य स्तरावर रिलीज करू इच्छित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER