आमिर खान लग्नाचा वाढदिवस गुजरातच्या जुनागढमध्ये साजरा करणार

aamir-khan

नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी बॉलिवुडमधील बहुतेक कलाकार नेहमी परदेशी जात असतात. पण सध्या कोरोनाची लाट असल्याने आणि अनेक देशांनी विमान प्रवासावर बंदी घातली असल्याने बॉलिवुडमधील कलाकारांना नाईलाजाने भारतातच राहून नवीन वर्षाचे स्वागत करावे लागत आहे. आमिर खानच्या (Aamir Khan) लग्नाचा वाढदिवस नवीन वर्षाच्या दोन दिवस आधीच येत असल्याने तो लग्नाचा वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत साजरा करीत असतो. यासाठी तो परदेशी जात असतो. पण कोरोनामुळे तो यंदा लग्नाचा वाढदिवस आणि नवीन वर्षाचे स्वागत भारतातच करणार आहे.

आमिर खानचे किरण रावबरोबर दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी होती रीना दत्ता. रीनाचा आणि त्याचा प्रेमविवाह होता. आमिर खानची आणि किरण रावची पहिली भेट 2000 मध्ये लगानच्या सेटवर झाली होती. आमिर तेव्हा दोन मुलांचा बाप होता. किरण राव शमिन देसाईची असिस्टंट म्हणून सेटवर आली आणि आल्या आल्या आमिरच्या प्रेमात पडली होती. आमिर आणि किरण रावची लव्ह स्टोरी सुरु झाल्यानंतर आमिरने रीनाला 2002 मध्ये घटस्फोट दिला. मात्र यासाठी त्याला 50 कोटी रुपये रीनाला पोटगी म्हणून द्यावे लागल्याचे सांगितले जाते. एकूणच किरण रावच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आमिरने इतकी मोठी रक्कम रीनाला दिली होती. त्या काळातील हा सगळ्यात महगडा घटस्फोट होता. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 मध्ये लग्न केले होते.

लग्नाला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान, किरण, मुलगा आझाद, मुलगी इरा आणि भाचा इरफानसोबत काल एअरपोर्टवर फोटोग्राफरना दिसला होता. खाजगी विमानाने हे कुटुंब गुजरातला रवाना झाले होते. आमिरने यावेळी मुलगा आझादचा हात पकडलेला दिसत होता. किरण रावही पांढरे केस न लपवता फोटोग्राफरना फोटो देत होती. आमिर खान नेहमीच त्याच्या मुलाला मीडियापासून दूर ठेवतो. त्याच्याबाबत कधीही कोणतीही माहिती तो व्हायरल होऊ देत नाही. त्यामुळे आझादचे अत्यंत कमी फोटो असल्याने फोटोग्राफर्स त्याचे जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न करीत होते. आमिर खान काल रात्रीच पोरबंदर एयरपोर्टला पोहोचला आणि तेथून तो जूनागढ़ला गेला, आमिर दोन-तीन दिवस येथे राहाणार असून तो गिरच्या जंगलातही जंगल सफारीसाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER