आमिर खान जेवत राहिला आणि मला विचारलेही नाही- दीपिका

Deepika Padukone-Amir Khan

सोशल मीडियामुळे(Social Media) कलाकार आपले जुने फोटो (Old photos) आणि जुन्या आठवणी आपल्या प्रशंसकांशी शेअर करू लागले आहेत. सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय नाहीत पण अनेक कलाकार सोशल मीडियावर सतत काहीतरी टाकत असतात आणि अॅक्टिव्ह असल्याचे दाखवत असतात. दीपिका पदुकोननेही (deepika Padukone) 20 वर्षांपूर्वींचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला असून त्याच्यासोबत दिलेली कॅप्शन खूपच वेगळी असल्याने तो खूपच व्हायरल झाला. एवढेच नव्हे तर प्रशंसकांच्या गमतीदार कमेंट्सही दीपिकाला वाचायला मिळत आहेत. दीपिकाने पोस्ट केलेला फोटो 1 जानेवारी 2000 चा आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानला भेटण्यासाठी दीपिकाचे आंतरराष्ट्री. दर्जाचे बँडमिंटनपटू असलेले वडिल प्रकाश पदुकोन संपूर्ण कुटुंबासह गेले होेते. यावेळी त्यांची पत्नी उज्वला आणि मुली दीपिका, तनीषाही होत्या. फोटोत दीपिका आमिरच्या अगदी बाजूला बसलेली दिसत आहे. या फोटोसह दीपिकाने लिहिले आहे, मी तेव्हा 13 वर्षांची होती आणि आम्ही आमिरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. आम्ही गेलो तेव्हा आमिर लंच घेत होता. तो दही भात खात होता. मला भूख लागलेली होती. तशी मी नेहमीच उपाशी असते. परंतु आमिरने मला जेवणासाठी विचारलेही नाही आणि मीसुद्धा काही खाल्ले नाही. दीपिकाचा हा फोटो आणि त्याची कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER