शाहरुखच्या घरी पार्टीसाठी घरून टिफिन घेऊन आला होता आमिर खान

Aamir Khan had brought tiffin from home for a party at Shah Rukh's house

आमिर खान  (Aamir Khan)बॉलिवु़डमधील (Bollywood) पार्ट्यांना फार क्वचितच जातो. पुरस्कार समारंभांनाही तो हजेरी लावत नाही. एवढेच नव्हे तर कलाकारांनी आयोजित केलेल्या खाजगी पार्ट्यांनाही तो जात नाही. क्वचित कधी तरी एखादी खास पार्टी असेल तर मात्र तो आवर्जून हजेरी लावतो. परंतु असे प्रसंगही क्वचितच येतात. मात्र अशा पार्ट्यांनाही हजेरी लावताना आपण आमिर खान आहोत हे तो विसरत नाही. याचा एक अत्यंत उल्लेखनीय असा किस्सा आहे.

साधारणतः पाच एक वर्षांपूर्वी शाहरुख खानने (Shahrukh Khan) त्याच्या मन्नत बंगल्यावर एका खासगी पार्टीेचे आयोजन केले होते. आमिर खानलाही त्याचे निमंत्रण देण्यात आले होते. अशा पार्ट्यांना आमिर जात नाही. परंतु अॅप्पल कंपनीचा सीईओ टीम कुक भारतात आला होता आणि त्याच्यासाठी शाहरुखने पार्टीचे आयोजन केले होते. म्हणून आमिर खान पार्टीला गेला होता.

गप्पा टप्पा झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली तेव्हा गौरीने आमिर खानला जेवणाबाबत विचारले आणि डायनिंग टेबलवर बसायला सांगितले. आमिरने जेवणार असे सांगितले परंतु मी माझे जेवण स्वतः आणले आहे असे म्हणाला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. त्यानंतर आमिर बाहेर गेला आणि आपल्या गाडीतून जेवणाचा डबा घेऊन आणि सगळ्यांसोबत जेवला. आमिरने स्वतःच एकदा ही गोष्ट सांगितली होती. आमिर म्हणाला मी तेव्हा दंगल चित्रपट करीत होतो आणि डाएटवर असल्याने घरचे जेवणच मी खात असे. तुम्ही शाहरुखला हे विचाराल तर तो सुद्धा ही गंमत चविष्टपणे सांगेल असेही आमिर म्हणाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER