आमीर खानचा सातारकरांना मदतीचा हात

Aamir Khan.jpg

सातारा : अभिनेता आमीर खान (Aamir Khan) पाणी फौंडेशननंतर (Panni foundation) पुन्हा एकदा सातारकरांच्या मदतीला धावला आहे. जिल्हा प्रसाशनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमधील (Jumbo Covid Hospital) ऑक्‍सिजन युनिटसाठी आमीर खानने 11 लाख तर अभिनेत्री आलिया भट व अभिनेता रणबीर कपूर यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

जिल्ह्याचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांच्या ‘अबिल’ ग्रुपने 15 लाख रुपयांचा निधी या हॉस्पिटलसाठी दिला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या सर्वांना मदतीची साद घातली होती. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या गंभीर संकटाशी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा धीराने सामना करत आहे. हॉस्पिटलमध्ये 13 हजार किलोलीटर ऑक्‍सिजन युनिट उभारण्याचे आव्हान होते. यासाठी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता सिंह यांनी बॉलीवूडमधील सेलिब्रिटी व उद्योजकांना साद घातली. त्यास प्रतिसाद आमीर खानने 11 लाख रुपयांची मदत केली आहे. वॉटर कपच्या माध्यमातून आमीरची येथील मातीशी नाळ जोडली गेली आहे. आमीर केवळ स्वतः मदत करून शांत बसला नाही तर अभिनेत्री आलिया भट व अभिनेता रणबीर सिंग यांच्याकडूनही मदत मिळवून दिली आहे. या दोघांनी प्रत्येकी पाच लाख रुपये दिले आहेत. ऑक्‍सिजन युनिटची मोठी टाकी गुजरातमधील आयनॉक्‍स कंपनीने तयार केली आहे. सेलिब्रिटींकडून मिळालेला मदतनिधी शेखर सिंह यांनी थेट आयनॉक्‍स कंपनीच्या खात्यावर वर्ग करून पारदर्शकता जपली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER