
मुंबई : मागील दोन महिन्यात ‘आरे’ (Aarey)च्या जंगलात लागलेल्या २१ आगींच्या घटना घडल्या आहेत . मात्र याबाबत सरकार निष्क्रीय असून, याचा ‘आप’ (AAP)ने निषेध केला आहे.या व्यतिरिक्त आता पर्यावरण मंत्री कुठे आहेत? असे म्हणत आरे वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या दाव्यांचे काय झाले? असाही सवाल ‘आप’ने केला आहे. येथे आगी लावत मुबंईकरांच्या पाठीत सुरा खूपसून; आरेचे जंगल बिल्डरांच्या ताब्यात देत मुंबईकरांना फसविण्याचा डाव आहे का? अशी टीका करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
‘आरे’च्या जंगलात लागलेल्या आगींनी अनेक अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडली आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे. जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. हा अत्यंत नाजूक पर्यावरणीय भाग आहे.
‘आरे’चा भाग हा भूजलासाठी महत्त्वाचा पाणलोट क्षेत्र आहे. शिवाय मुंबईतील मिठी आणि ओशिवरा या दोन नद्यांचे मूळ क्षेत्र या भागात आहे. याच्यासोबत हा भाग जैवविविधतेचे माहेरघर आहे. ‘आरे’च्या या आगींबाबत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका काहीही करत नाही. जंगल नष्ट करून जमिनींवर आक्रमण करण्याचे काम सुरु आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला