पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का ? आदित्य ठाकरे म्हणाले…

Aaditya Thackeray

मुंबई : मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे .

साहेबरावने कृत्रिम पंजा नाकारला

शनिवारी पिंपरी-चिंचवड एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का असा प्रश्न विचारला. त्यावर, प्रस्ताव आल्यास पुण्यातही ‘नाईट लाईफ’बाबत विचार करू, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. “मुंबईत दिवसरात्र जी लोकं मेहनत करतात त्यांना रात्री भूक लागल्यावर कुठे जायचं, कुठे खायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. म्हणून ही संकल्पना तेथे सुरू केली. पुण्यातही कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. नक्कीच जर तुमच्याकडून प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार होऊ शकेल पण आत्ताच ठोस आश्वासन देता येणार नाही”, असे आदित्य म्हणाले.