
मुंबई : आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशातील ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालं. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की, अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. कोरोना काळात कोविडसाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? असा सवाल करतानाच जे बजेट जाहीर झालं ते या राज्यांना कसं मिळणार? हे सरकारनं जाहीर करावं, असं आव्हान त्यांनी दिलं.
देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र या बजेटमधून असं काहीच दिसून आलं नाही. सर्वात जास्त रोजगार निर्मिती सध्या पर्यटन क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे पर्यटनावर भर देणं अपेक्षित होतं. पण बजेटमध्ये त्यावर कुठलीही तरतूद केल्याचे दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला