जवानांच्या अपमानाचे प्रकरण : आदित्य ठाकरेंचे ट्विट

Aaditya Thackeray

मुंबई :- दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान गोरखा रेजिमेंटच्या जवानांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र सदनातील अधिकारी विजय कायरकर यांची उचलबांगडी करण्यात आली. विजय कायरकर हे महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) होते. त्यांनी  शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी गोरखा रेजिमेंटच्या जवानांशी गैरवर्तन केले. या पार्श्वभूमीवर राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत कायरकर यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.

गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत. पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये जेवणासाठी ताटं वाढून ठेवण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला येथे जेवता येणार नाही. तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे, असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून अक्षरश: हाकलले. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.