कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुंबईत जम्बो सुविधा ; आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरामध्ये एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या विविध कामांची रविवारी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी पाहणी केली.

मालाड येथे एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड सेंटरची (Jumbo Covid Canter) पाहणी केली. या कोविड सेंटरमध्ये बीकेसी येथील कोविड सेंटरप्रमाणेच सर्व सुविधा असतील. संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून पिडिअ‍ॅट्रिक वॉर्डही येथे असेल. एकूणच वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ट्वीट या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत सुसज्ज समर्पित कोविड १९ हॉस्पिटल उभारण्यात येत आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button