तो पक्ष आहे की, संघटना हेच कळत नाही; आदित्य ठाकरे मनसेला म्हणाले ‘टाईमपास टोळी’

adityaThackeray 7 Raj Thackeray

मुंबई : राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली. तो पक्ष आहे की संघटना हेच कळत नाही, असे म्हणत मनसे ही केवळ ‘टाइमपास टोळी’ असल्याची मिस्कील टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंधनाचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारला जो सल्ला दिला आहे, तोच सल्ला त्यांनी केंद्राला द्यावा, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER