‘पंतप्रधानांनी केलेले कौतुक आमच्यासाठी व्हिटॅमिन’ आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Maharashtra Today

पुणे : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडून दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. मात्र विरोधकांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनीही पंतप्रधानांच्या कौतुकावर भाष्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना टोला हाणला.

कात्रज येथील कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाइफ केअर हॅास्पिटलच्या कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र काम केले तरी वेळ कमी पडतोय. त्यामुळे कोरोनाच्या संकटाशी ज्या पध्दतीने महाराष्ट्राने लढा दिला, त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालय अन् पंतप्रधानांनीही केले आहे. हे कौतुक म्हणजे आमच्यासाठी व्हिटॅमिन आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच हे व्हिटॅमिन घेऊन आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या योग्य निर्णयांमुळे ही साथ आटोक्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून योग्य पद्धतीने काम करत आहेत. असा अभ्यास इतर मुख्यमंत्र्यांनी केला असता तर त्या राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. सर्वोच्च न्यायालयाने निर्माण केलेला टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला. त्यामुळे महाराष्ट्राचे जगभर कौतुक होत आहे. शिवेसनेचे खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button