मी निवडणूक लढण्यापेक्षा दुष्काळ निवारणाचा प्रश्न जास्त महत्वाचा : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

सोलापूर :- राज्यात भीषण दुष्काळाचे संकट आहे. या दुष्काळाचे राजकारण शिवसेना कधीही करणार नाही, अन्य कोणीही असे करू नये. तसेच आगामी काळात माझा निवडणूक लढण्याचा प्रश्न महत्वाचा नाही तर महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ निवारणाचा प्रश्न महत्वाचा आहे, असं वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले होते . यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला . विधानसभा निवडणूक लढवणार का? यावर मी आत्ताच बोलणार नाही. आता मला दुष्काळ निवारणाचा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो . पण माझ्यासारखे अनेक शिवसेनेतले तरूण माझ्यापेक्षा जास्त काम करत आहेत. त्यांच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ?

दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी शेतक ऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले . मराठवाड्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांवर उपसरमारीची वेळ आली असून यासंदर्भात आपण तातडीने मी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.