31 जानेवारी पूर्वी लाभार्थी रेशनकाडवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग होणार

e-KYC-Daukat Desai

कोल्हापूर :- रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. 31 जानेवारी पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे 100 टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी कळविले आहे.

नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्रधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक सिडींग करण्यात आले नाही त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे व सिडींग पूर्ण करावे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांच्या संपर्क साधावा. दि .31 जानेवारी पर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तींचे अनुज्ञेय धान्य माहे फेब्रुवारी महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER