” होम मिनिस्टर चं नवं पर्व “

Aadesh Bandekars home minister marathi serial

आपल्या पैकी अनेकांच्या घरी ” होम मिनिस्टर ” (Home minister) ही मालिका अगदी न चुकता बघितली जाते. झी मराठीवरील या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट नक्की काय आहे हे या शो चे सूत्रसंचालक अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी सांगितलं. आदेश बांदेकर गेली अनेक वर्षे हा शो आपल्या साठी रोज भेटीला घेऊन येतात पण आता या शो मध्ये काहीतरी भारी होणार आहे. हा नवा ट्विस्ट नेमका काय आहे हे बघूया.

झी मराठी वाहिनीने नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावरून या शो मध्ये नक्की काय हटके होणार आहे याची माहिती दिली आहे. झी मराठी च्या इंस्टाग्राम पेजवरून या शो बद्दल हा ट्विस्ट सांगताना वाहिनी सांगते की ” आई आणि बायको दोघीच्या कात्रीत नेहमी सापडणारा पण दोघींचा तेवढाच लाडका ” माझा बबड्या ” होम मिनिस्टरचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ” हे नवं पर्व आपल्या भेटीला येणार आहे. या शो चे सूत्रसंचालक आदेश बांदेकर देखील या नव्या पर्वासाठी तितकेच उत्सुक होते. होम मिनिस्टर हा अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे.

हे नवीन पर्व आता सुरू होणार असून यात नेमकं काय बघायला मिळणार यांची उत्सूकता प्रेक्षकांच्या सोबतीने चॅनेल ला सुद्धा आहे. झी मराठी वरील आसावरी आणि बबड्या हे दोघे अल्पावधीतच खूप प्रसिध्द झालेत आणि आता तर चक्क या दोघांच्या अनुभवावरून होम मिनिस्टरचं नव कोर पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

आसावरीच्या लाडक्या बबड्यासारखा बबड्या प्रत्येक घरात असतो. मोठा झाल्यावर तो कधी पत्नीचा असतो तर कधी आईचा. या दोघींच्यामध्ये तो अडकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘अग्गंबाई-सासूबाई’ मालिकेसारखंच प्रत्येक घरात लाडोबा बबड्या हा असतोच. आता हाच बबड्या पैठणी मिळवून देण्यासाठी आईला मदत करतोय की पत्नीला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आई आणि बायको या  दोघींच्या कात्रीत नेहमी सापडणारा पण दोघींचा तेवढाच लाडका ‘माझा बबड्या’ हे  होम मिनिस्टरचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला आलं आहे. मालिकेत नेहमी आईच्या मागे असणारा बबड्या हा अनेक कारणांनी सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरतो. बबड्या आणि आसावरी यांची केमिस्ट्री आपण सगळेच मालिकेत बघत आलो आहोत पण आता याचं ट्रेंडी बबड्या मुळे चक्क होम मिनिस्टर एक नवं पर्व आपल्या भेटीला घेऊन आलंय. आता पैठणी नेमकी कोणाला मिळणार हे बघायला मज्जा येणार. आईचा लाडका बबड्या आई ला की बायको ला पैठणी जिंकून देणार आणि त्यांच्या मधली चढाओढ या नव्या पर्वात अनुभवयाला मिळणार आहे.

लॉकडाऊन मुळे भाऊजी ने अर्थात आदेश बांदेकर यांनी या शो चे व्हर्च्युअल भाग सुरू केले होते. घरोघरी जाऊन आपल्या वहिनीच्या चेहऱ्यावर हसू आणून सगळ्या कुटूंबाला एकत्र घेऊन येणाऱ्या या शो चे आता व्हर्चुअल भाग झी मराठीवर प्रक्षेपित होत आहेत. लॉकडाऊन दरमान्य प्रेक्षकांच मनोरंजन थांबू नये आणि ते अखंड सुरू राहावं म्हणून चॅनेल आणि मालिकेने हा अनोखा निर्णय घेतला आणि ही मालिका आजही प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांनी हा शो खूप काळापासून सुरू ठेवला आहे. प्रेक्षकांच एक अनोखं नात या शो मधून अनुभवयाला मिळत. आजवर झी मराठी ने होम मिनिस्टर चे अनोखे आणि तितकेच कल्पक शो केले आहेत आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. आता हे नवं पर्व देखील प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER