
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाविकासआघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध स्तरावरून उद्विग्न आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मराठा आरक्षण खटल्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही एक ट्विट करुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R Patil) यांच्या आठवणींना उजाळा दिला. आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता, अशी भावनात्मक प्रतिक्रिया विनोद पाटील (Vinod Patil) यांनी व्यक्त केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात आर. आर. पाटील यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द विशेष गाजली होती. या काळात आबांनी पोलीस भरती आणि डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या धडाडीचे सामान्य लोकांकडून प्रचंड कौतुक झाले होते.
आबा आज तुमची खूप आठवण येतेय,
गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता…😥 pic.twitter.com/kW5OdGGHRN— Vinod Patil (@vnpatilofficial) March 20, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला