मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब

भिऊ नकोस; भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिला दिलासा

Chitra Wagh & Mehbuub Shaikh

मुंबई :  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahbub Sheikh) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब आहे. ती ‘नॉट रिचेबल’ असल्‍याची माहिती मिळाली आहे. यानंतर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ जारी करून आरोप केला, तपासाच्या नावाखाली पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पीडितेच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. पीडितेने घाबरण्याचे कारण नाही. (Bjp Chitra Wagh on mahebub shaikh Case Victim Girl) “कलम ३७६ अनुसार गुन्हा नोंद होऊनदेखील पोलीस आरोपीला तपासाच्या नावाखाली वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोमवारीच पीडितेने जबाब दिला होती की, ‘मला या प्रकरणात जे सांगायचे आहे ते पोलिसांना न सांगता कोर्टात सांगेन. आणि आज बातमी येते की तरुणी गायब आहे. मला या प्रकरणात पोलिसांची बाजू अतिशय संशयास्पद वाटते’, असा सनसनाटी आरोप चित्रा वाघ यांनी केला. “या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नाहीत, अशी बेजबाबदार वक्तव्ये नेतेमंडळींनी केली. त्यानंतर साहजिकच पीडितेवर दबाव आला. आणि ती आज गायब आहे. मला तिला सांगायचंय की, तू अजिबात घाबरू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. झालेल्या कृत्याबद्दल आरोपीला शिक्षा मिळायलाच हवी. ” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

प्रकरण

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, १० नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले आणि १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER