देव तारी त्याला कोण मारी

Viral Photo

नवी दिल्ली :- देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आणणारी घटना घडली. हरियाणातील रोहतकमध्ये एक महिला रेल्वेखाली सापडली पण सुदैवाने ती अपघातातून बचावली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला धावत्या रेल्वेखाली अडकून पडली. त्यानंतर तिने रेल्वे रुळाखाली झोपून आपला जीव वाचवला. सदर महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. याच दरम्यान सिग्नल पडल्याने थांबलेली रेल्वेगाडी सुरु झाली. मात्र, क्षणातच प्रसंगावधान राखत ती रेल्वे रुळाखाली झोपून राहिली. यावेळी तिच्या अंगावरुन रेल्वेगाडी गेली पण तिला कसलीही दुखापत झाली नाही. रेल्वे पुढे गेल्यानंतर लोकांनी तिला रुळावरुन उठविले. तिच्या या हिंमतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.

याआधी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवरील आहे. धावत्या रेल्वेखाली पडणाऱ्या एकाला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या महिला कर्मचाऱ्याने वाचविले. हा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या महिला कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER