स्त्रीचा शाप भोगावा लागतो, अशोक पंडितांचा संजय राऊतांना टोमणा

मुंबई :शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut ) आणि अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) यांच्या शाब्दिक चकमकीत मुंबई मनपाने कंगनाचे ऑफिस तोडले. यासाठी नेटीजन्सने मुंबई मनपावर टीकेची झोड उठवली. चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashok Pandit) यांनीही कंगनाची पाठराखण केली. संजय राऊत यांना टोमणा मारला – एका स्त्रीने दिलेला शाप महागात पडतो, (भोगावा लागतो).

अशोक पंडित यांनी ट्विट केले – “एक स्वप्न उद्धवस्त झाले. देव तिला आणखी बळ आणि शक्ती देवो. एका स्त्रीचा शाप महागात पडतो संजय राऊतजी”. पंडित यांच्या या ट्विटनंतर खळबळ उडाली. अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला, काहींनी टीकाही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER