कोरोना अहवालाचा घोळ ; रस्त्यातच महिलेची प्रसुती

कोरोना अहवालाचा घोळ-रस्त्यातच महिलेची प्रसुती

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) की निगेटिव्हच्या घोळामध्ये कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आजरा (Aajra) तालुक्यातील एका माहेरवाशीण महिलेचे बाळंतपण रस्त्याशेजारी करण्याची वेळ आली. भर वस्तीत घडलेल्या या प्रकाराने कोरोनाच्या दहशतीचा अनुभव पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आला. महिलांनी आसरा देत प्रसूती झाली.

चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सासर व आजरा तालुक्यातील साळगाव येथील माहेर असलेल्या एका महिला बाळंतपणासाठी सकाळी गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र, तेथील एकाही दवाखान्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतले नाही. कुटुंबाने नेसरी येथे नेले. तेथेही घेतले नाही. शेवटी आजरा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये आणले. येथे कोरोना संदर्भात चौकशी केली. कुटुंबाने गडहिंग्लज येथे दिलेल्या रिपोर्टमध्ये ही महिला निगेटिव्ह होती. मात्र, हा कागद फाडला असल्याने गडहिंग्लज येथे दवाखान्यात चौकशी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले गेले. ते कुटुंब दवाखान्याच्या पायरीवर बसून होते. डॉ. बी. एफ. गॉडद व डॉ. बी. बी. गॉडद शस्त्रक्रिया करत होते. महिलेचे हाल बघून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी डॉक्टरांना फोनद्वारे परिस्थिती सांगितल्याने डॉ. गॉडद तातडीने बाहेर आले.पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रकार स्टाफने सांगितला. मात्र, डॉ. गॉडद यांनी त्याकडे दुर्लक्ष करत बाळंतपण जवळ आलेल्या महिलेला तपासणी करत असतानाच हॉस्पिटलसमोरील रस्त्याशेजारीच तिची प्रसूती झाली. तातडीने महिलेच्या भोवती कापडी स्टँड उभे केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER