दिल्लीत एक आठवड्याचा कर्फ्यू; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

Maharashtra Today

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला बडे अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. देशात रोज कोरोना (Corona)रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ६१९ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित शहा काय म्हणाले?
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. तूर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे; पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. “गेल्या वर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती.

मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे. आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होतो. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही.” असे शहा यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button