15 मिनिटात विक्रम बदललेल्या पहिलवान मैत्रीणींची अनोखी कहाणी

Anshu Malik - Sonam Mailk - Maharastra Today

भारताच्या महिला कुस्तीमध्ये (Woman wrestling) फोगाट या आडनावाने स्वतःचे एक खास स्थान बनवले आहे. तसेच आता मलिक आडनावाच्या महिला मल्ल चमकत आहेत. आॕलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनंतर आता अंशू मलिक (Anshu Malik) व सोनम मलिक (Sonam Malik) या चर्चेत आहेत. या दोघीही टोकियो आॕलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) पात्र ठरल्या आहेत. अल्माटी येथे सुरु असलेल्या आशियाई आॕलिम्पिक पात्रता स्पर्धेतून त्यांनी ही संधी कमावली आहे.

विशेष म्हणजे शनिवारी अंशू मलिक ही 57 किलोगटात पात्र ठरली तेंव्हा 19 वर्ष 8 महिने आणि 5 दिवस वयासह ती आॕलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची सर्वात कमी वयाची महिला कुस्तीगीर ठरली होती पण हा विक्रम फक्त 15 मिनिटेच तिच्या नावावर टिकला. 15 मिनिटानंतर सोनम मलिक 62 किलोगटात आॕलिम्पिकसाठी पात्र ठरली तेंव्हा तिचे वय 18 वर्ष 361 दिवस होते. याप्रकारे भारतीय महिला कुस्तीच्या इतिहासातील हा विक्रम फक्त 15 मिनिटातच बदलला.

अंशू मलिक हिने पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या शोखिदा अख्मेतोव्हा हिला मात दिली आणि टोकियो वारी निश्चितकेली. त्यानंतर सोनमने 62 किलोगटाच्या उपांत्य लढतीत कझाकस्तानच्या अयोलीम कास्सीमोव्हा हिच्यावर बाजी मारली.

योगायोगाने अंशू व सोनम या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्विच आगरा येथील राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी अंशू म्हणाली होती की आमची चांगली मैत्री आहे. आमच्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. आमचे वय सारखे आहे आणि एकाच स्पर्धेत आम्ही सारखेच यश मिळवले आहे, ज्युनियर नॕशनल्समध्येही त्यांनी सोबतच पदके जिंकली होती. वर्ल्ड कॕडेट चॕम्पियनशीपमध्येही त्यांनी 2017 मध्ये सुवर्ण व 2018 मध्ये कास्यपदक असे यश सोबतच कमावले होते. त्यामुळे आम्ही सोबतच कुठल्याही स्पर्धेला गेलो तर आम्हाला चांगले यश मिळते असा आपला विश्वास असल्याचे अंशूने म्हटले आहे.

विशेष म्हणजे दोघीःनाही एकमेकींच्या यशात आनंद आहे.त्यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही. अंशूचे वडील धरमवीर यांना अभिनंदनाचा पहिला फोन सोनमचे वडील राज मलिक यांनीच केला होता यावरुन या दोन मलिक कुटूंबातील संबंध किती चांगले व मैत्रीपूर्ण आहेत याची कल्पना येते.

आता ही मैत्री असली तरी 2016 मध्ये मात्र त्यांच्यात स्पर्धा होती. त्यावेळी त्या राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत एकाच गटात -56 किलोगटात खेळल्या. त्यावेळी त्यांचा एकमेकींशी परिचय नव्हता. आणि त्यांची लढत अतिशय अटीतटीची झाली होती. त्याने सोनमने अक्षूला मात दिली होती. पण अक्षूच्या वडिलांना वाटत होते की काहीतरी गडबड झाली आहे आणि त्यावरुन सोनमच्या वडिलांशी त्यांचा मोठा वाद झाला होता. यानंतर राज्य कॕडेट स्पर्धेत अंशूने सोनमला मात दिली. त्यावेळीसुध्दा असाच वाद झाला होता. मात्र ही स्पर्धा पुढे मैत्रीत बदलली. त्यासाठी कारण ठरले लखनऊ येथील कॕडेट गटाचे राष्ट्रीय शिबीर. त्यासाठी दोघी, अक्षू व सोनिया यांची निवड झाली. दोघीही एकट्याने पहिल्यांदाच घराबाहेर पडल्या आणि त्या एकाच खोलीतही होत्या. तेथे त्यांना लक्षात आले की आपल्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्या आहेत. तेथून त्यांची मैत्री झाली. आणि आता आपण सोबतच स्पर्धांना गेलो तर यश नक्की मिळते असा त्यांचा विश्वास झाला आहे.

या दोघींची गावेसुध्दा शेजारी शेजारी आहेत. अंशू ही जिंद जिल्ह्यातील निदानी गावची तर सोनमचे सोनीपत जिल्ह्यातील मदिना गाव तेथून फक्त 39 किलोमीटरवर. या दोघींचे वडीलही पहिलवान होते. सोनमचे वडील राज हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुध्दा खेळलेले आहेत.

अंशू गेल्यावर्षी राष्ट्रीय विजेती होती. त्यामुळे आशियाई आणि वर्ल्ड कॕडेट स्पर्धेत तिला संधी मिळाली आणि तिने पदकेही जिंकली. त्यावेळी या दोघींच्या वडिलांना वाटले की आपण भांडत बसण्यापेक्षा सोबत तयारी केली तर पोरींचे भले होईल. आणि तेंव्हा मुलींपाठोपाठ वडिलांचीही दोस्तीझाली. आणि त्या दोन्ही मैत्रीणी असल्याने एकाच वजनगटात स्पर्धा करण्याऐवजी वेगवेगळ्या वजनगटात खेळायचा निर्णय त्याच वेळी झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button