इटकीयाविक शहरात सुरू आहे दोन महिन्यांची रात्र!

Utqiagvik

उत्तर अलास्का मधील, इटकीयाविक, पूर्वी बॅरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात दोन महिन्यांची रात्र सुरू होणार आहे. १५ नोव्हेंबर २०२० च्या सूर्यास्तानंतर ही रात्र सुरू झाली आहे. आता इथे सूर्योदय २२ जानेवारी २०२१ ला होईल.

सुमारे ४ हजार लोकसंख्येचे हे शहर अमेरिकेत उत्तर ध्रुवावर आहे. इथे मार्चपर्यंत कमाल तपमान शून्य डिग्रीच्या खाली राहील.

अलास्का हे अमेरिकेतील मोठ्या राज्यांपैकी एक आहे. हा भाग त्याच्या नैसर्गिक वैशिष्ठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे हिवाळ्यात रात्र व दिवस २४ तासांचे असतात. हा भाग ध्रुवाच्या टोकावर असल्याने इथे सूर्य क्षितिजावर फक्त ६ डिग्री खाली – वर गेला की सूर्यास्त – सूर्योदय होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER