उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याचा तयारीत

Vidhan Bhavan

मुंबई : कोरोना (Corona) महामारीमुळे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. कोरोनाचे संकट बघता दोनच दिवस हे अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस घेण्यात येणार आहे. सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) अपयश आले आहे.

राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना विशेषत: ओला दुष्काळाचा फटका बसलेल्यांना मदत न मिळणं अशा विषयांमुळे भाजपने बहिष्कार टाकला आहे. दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER