काँग्रेसमध्ये धुसफूस, ‘श्रद्धा और सबुरी’ सत्यजित तांबे यांचं सूचक ट्वीट

Satyajeet Tambe - Congress

मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सोपवण्यात आली. विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस (Congress) अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचं नावं नाही. सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘श्रद्धा और सबुरी’ असं ट्वीट केलं आहे.

या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER