कार आणि ट्रकचा भीषण अपघात; आईवडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Accident

अकोला : राष्ट्रीय महामार्ग (National Highways) क्रमांक-६ वरील नागठाणा फाट्याजवळ आज दुपारी कंटेनरने कारला समोरासमोर जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात (Accident) चार जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातात आईवडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा सिटी कारला  (एमएच ०४ बीडब्ल्यू ५२५९)  अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरने  (एमएच १५ एफव्ही १४१३)  जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. कारचा समोरील भाग चक्काचूर झाला.

नवरा, बायको व त्यांची दोन चिमुकली घटनास्थळीच ठार झाले. हुसेन गुलाम हुसेन(५०), साबीया हुसेन हबीब(३०) आणि हुसेन हबीब मो.हबीब (३५) हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना अकोल्यातील लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  अपघातातील जखमी दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER