संगीत जगताची सैर अर्थात” म्युझिक थेरपी”

Music Therapy

हाय फ्रेंड्स ! म्युझिक थेरपी हा शब्द आपण बऱ्याच जणांनी ऐकला असेल किंवा नसेलही, पण संगीताच्या सामर्थ्याचा अनुभव तर निश्‍चितपणे सगळ्यांनी घेतला असेल. बरेचदा आपण वयाने वाढत जातो आणि आई-वडिलांपासून शिक्षण, लग्न ,नोकरीच्या निमित्ताने दूर जातो .आणि मग कधीतरी कुठेतरी ते गाणे ऐकायला येते, जे आपले आई किंवा वडील आपल्याला झोपवताना म्हणत असत. किंवा जुनी डायरी सापडते ज्यात आपल्या आईने लिहिलेले आणि संगीत दिलेले साधेसे भजन असते आणि मग…मग काय होतं ? नकळत त्यांच्या आठवणींनी डोळ्यातून घळघळ पाणी येतं.

माझा अनुभव शेअर करते कि माझी आई कॅन्सर ने आजारी होती, तिला शेवटी शेवटी प्रचंड वेदना व्हायच्या. यात दोन कळा ,वेदनांच्या मध्ये ती मला एक गाणं म्हणायला सांगायची, कदाचित त्यामुळे पुढच्या वेदना सहन करण्याची ताकद मिळवायची ! “शामसुंदर मदनमोहन जागो मेरे लाला” बहुतेक खमाज रागात गुंफलेली भैरवी होती ती! हे मला तेव्हा कळत नव्हतं तेच बरं होतं. त्या आजारातच ती आम्हाला सोडून गेली. पण मी आजही ते गाणं म्हणू शकत नाही. मला प्रचंड त्रास होतो त्या आठवणींनीही !

हा अनुभव प्रत्येकालाच असणार ,की कुठला ना कुठला म्युझिक ऐकलं की काहीतरी नकोस वाटतं. साधारणतः व्हायोलिन वाद्य ऐकल्यावर 92 टक्के लोकांना दुःख वाटतं. याला कारण आहे म्युझिकल ब्रेन प्रोग्रामिंग ! कारण पूर्वीपासून बरेचदा हिरॉइन रडायला सुरुवात करण्यापूर्वी सिनेमांमध्ये व्हायोलीन वाजत. असं काही ब्रेन प्रोग्रामिंग एकसारख असलं तरी काहींच्या बाबतीत ते व्यक्तिपरत्वे भिन्न पण असू शकत. एका जणाला ओवी म्हंटली कि रडायला येतं. वर उल्लेख केल्याप्रमाणे म्युझिकल मेमरी ही इतरांपेक्षा खूप पावर फुल मेमरी आहे. म्हणूनच या थेरपीचा सकारात्मक परिणामांसाठी ही उपयोग केला जातो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्या गोष्टींना चाली लावून दिल्या जातात.

तर ही थेरपी. शास्त्रीय दृष्ट्या कशी काम करते? आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. डावा मेंदू आणि उजवा मेंदू. दोन्हीच्या सुयोग्य वापरातून आपण मेंदूचा पूर्ण वापर करतो अस पण म्हणता येईल. पण प्रत्यक्षात आपण असा वापर करत नाही. डावा मेंदू हा पूर्णपणे लॉजिक, विश्लेषण, कार्यकारणभाव आकडेमोड, अशा गोष्टींशी संबंधित असतो. तर उजवा मेंदूत बहुतांशी क्रिएटिव्ह संबंधित सगळ्या गोष्टींचे सेंटर्स असतात. क्रिएटिव्हिटी म्हणजे मग ती कुठल्याही क्षेत्रात असो. कुठलीही कला असो.

आता अलीकडे म्युझिक थेरपीला प्रचंड डिमांड आहे. याला कारण आजचे प्रश्न जे आहे ,ते पूर्णपणे बदललेले आहेत. काही दिवसांपूर्वीच हे जे काही प्रश्न होते, त्यापेक्षा कोरोना मुळे निर्माण झालेले नवे प्रश्न जर सोडवायचे असतील, तर त्याला क्रिएटिव्ह अन्सर्स मिळवून घ्यावे लागणार आहेत. आणि ते काम करण्याची जबाबदारी ही उजव्या मेंदूची आहे. कारण गरज आहे ती क्रिएटिव्हिटीची.

यात संगीताचा काय संबंध ? संगीतामुळे उजव्या मेंदूतले एकूण सतरा केंद्र ऍक्टिव्हेट होतात. दोन्ही मेंदूतील वाचन ,खेळ या सगळ्यांपेक्षा जास्त केंद्राची डेवलपमेंट एकावेळी होणारी एकच व्यवस्था आहे आणि ती म्हणजे संगीत. म्हणूनच आपल्या दैनंदिन दिनचर्येत संगीताला स्थान असणे अत्यंत आवश्यक आहे.

नेमकं काय करतो आपण ? वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत उजव्या मेंदूचे ॲक्टिवेशन चांगल्याप्रकारे होते. साधारणतः सहा ते दहा वर्षापर्यंत आपण मुलांना वेगवेगळ्या क्लासला घालतो. आणि त्यामुळे डाव्या मेंदूची केंद्रे ऍक्टिव्हेट करण्यातच,उजव्या मेंदूची केंद्र उद्दीपित होणे राहून जाते. मागे पडते ,दुर्लक्षिले जाते. मग जेव्हा बावीस-तेवीस यावर्षी आय टी सारख्या कंपन्यांमधून innovation आणि क्रिएटिव्हिटी ची मागणी व्हायला लागते, त्यावेळी अचानक डावा मेंदू ऍक्टिव्हेट कसा होणार ? म्हणूनच लाइफ लॉंग, दोन्ही मेंदूना ॲक्टिवेट करण्यासाठी दैनंदिनी मध्ये संगीताचा समावेश अनिवार्य आहे.

कुठलेही गाणे ऐकताना आपल्या मूड वर परिणाम का होतो? कधी वीररस जागृत होतो, कधी मातृ भाव जागृत होतो, तर कधी हळुवार प्रेमभावना उमलतात. असं का? प्रत्येक वेळी म्युझिक म्हणजे शब्द असतात असे नाही ,असले तर ते अर्थपूर्ण असतात असेही नाही. पण तरीही परिणाम होतो. याला कारण cognative power of brain ! ही सगळ्यांमध्येच असते .पण संगीताने ती जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट केली जाते.

अजून संगीत मनावर कसा परिणाम करते ? मन आणि मेंदू वेगळे नाहीत. जेव्हा मानवाच्या मेंदूची तृप्ती होते, त्यावेळी डोपामाइन स्त्रवते. भूक आणि कामतृप्ती यामधून जेव्हा तृप्ती होते त्यावेळी जितके डोपामाइन स्त्रवते तितकेच संगीतातूनही निर्माण होते. आणि आणि जगातील 94 ते 95 टक्के लोक संगीताचा आस्वाद घेऊ शकतात .याला वय, काळाचं ,वेळेचं बंधन नाही. केवळ चार ते पाच टक्के लोक,( म्युझिकल अन्हाडोमिया) musical anhedonia अशी एक स्थिती आहे,त्यामुळे संगीताचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण हे केवळ अपवादात्मक !

संगीत हे दोन प्रकारचा आनंद देऊन जाते. एक म्हणजे अपेक्षापूर्तीचा ! शास्त्रीयदृष्ट्या फुल्फिल्स एक्सपशटेशन्स. उदाहरणार्थ आपण लता मंगेशकरांचे गाणं ऐकणार आहोत. त्यावेळी आपल्या मनामध्ये काही एक अपेक्षा असतात, आणि रेकॉर्ड असलेल्या गाण्यांनी त्या पूर्ण होतात. दुसरी गोष्ट The joy surpasses expectations. ह्या जेव्हा आपण लाईव्ह कॉन्सर्ट ला जातो आणि त्यावेळी रेकॉर्ड पेक्षा वेगळी अशी एखादी “जागा” जेव्हा गायक स्टेजवर घेतो तेव्हा” व्वा ! “अशी दाद आपल्याकडून येते आणि अक्षरश: कधीकधी अंगावर काटा येतो. उदाहरणार्थ आशा भोसले यांच्या गाण्यातील” मलमली तारुण्य माझे !” यात त्या जेव्हा” मलमली “हा शब्द उच्चारतात ,त्यावेळी आपल्याला अक्षरश: तो स्पर्श जाणवतो. ही जादू या शब्दाची तर आहेच पण तो ज्या प्रकारे उच्चारला जातो त्या स्वरांची विशेष आहे.

शास्त्रीय भाषेत सांगायचं तर ,मेंदूतील लिंबिक सिस्टिम येथील म्हणजे (इमोशनल ब्रेन मधील) भावना ह्या आदिम आणि ठोकळेबाज अशा असतात. पण उत्क्रांतीतून जेव्हा कॉर्टेक्सची निर्मिती होते, त्यावेळी म्युझिकच्या सोबतीने त्या भावना आणखीन, आणखीन रिफाइनड होत जातात.

म्युझिक थेरपी कशाकशावर काम करते? तर सर्व प्रकारच्या या मानसिक आणि शारीरिक आजारांवर म्युझिक थेरपी काम करतेच. परंतु त्यासाठी काहीतरी झालंच पाहिजे किंवा आजारीच असायला पाहिजे असं नाही .तर जगण्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता कायम राहण्यासाठी दैनंदिन म्युझिक थेरपी उपयोगाची ठरते. ती दोन प्रकारे काम करते एक म्हणजे प्रायमरी थेरपी म्हणून आणि दुसरी सपोर्टिव थेरपी म्हणून ! याबरोबर पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा तर ती भाग आहेच. मानसिक आजारांमध्ये विथ मेडिकेशन प्रायमरी थेरपी म्हणून वापरता येते,ADHD, राग नियंत्रण एकाग्रता ,आत्मविश्वास अभाव, स्ट्रेस मॅनेजमेंट ,सुसाईडल निगेटिव्ह थॉट्स ,स्लीप डिसऑर्डर, डिमेन्शिया ,अल्झाईमर ,डिप्रेशन ,एन्झायटी ,ऑटिझम यासारख्या या सगळ्या आजारांमध्ये ही काम करते. त्याचप्रमाणे बीपी, heart problems ,शुगर, डायजेस्टिव्ह सिस्टिम ,हायपर टेन्शन, दात दुखी, ताप, डोकेदुखी ,बद्धकोष्ठता, कॉल्ड कफ याबाबतीत सपोर्ट थेरपी म्हणूनही वापरता येते.

प्रत्येक व्यक्तीला गाणं म्हणावसं वाटतं ,नृत्य करावसंही वाटतं. परंतु बरेचदा हे काय माझं वय आहे का? किंवा बापरे ! आपल्याला गाण्यातला काही कळत नाही,आपला आवाज भयंकर आहे ! कोण काय म्हणेल अशा सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन आपण आपल्या सगळ्या गाण्याच्या भावना दाबत राहतो.

फ्रेंड्स ! आजच्या या लेखाचा एवढा तरी उपयोग जरूर करावा. संशोधनाअंती कुठल्याही गायकाचं गाणं ऐकण्यापेक्षा ,तुमच्या स्वतःच्या आवाजाला ,तुमचा मेंदू जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो. तुमचा आवाज तुमच्यासाठी म्हणजे मेंदूसाठी सगळ्यात महत्त्वाचा आवाज आहे. मग का बर गायचे नाही ? निश्चितपणे गायला लागा. गुणगुणायला लागा. जेव्हा वाटेल तेव्हा ! जिथे असाल तिथे !! जसं येईल तसं !!! सारे के सारे गमाँको लेकर गाते चलो …..!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER