औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणीत एकूण ३९३ नवे रुग्ण

Aurangabad - Coronavirus

औरंगाबाद :- मराठवाड्यात रविवारी औरंगाबाद, नांदेड, बीड आणि जालना या चार जिल्ह्यांत कोरोनाने १३ जणांचा बळी घेतला. औरंगाबादेत ४, नांदेड जिल्ह्यात २४ तासांत ३, बीड जिल्ह्यात ४८ तासांत ४ बळी गेले, तर जालन्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, मराठवाड्यात रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात २४८, नांदेड ४४, परभणी ४४, बीड ५ आणि जालना जिल्ह्यात ५२ रुग्णांची वाढ झाली.

औरंगाबादेत नवीन २४८ रुग्ण : रविवारी मनपा क्षेत्रातील १८८ आणि ग्रामीण ६० असे २४८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ८,४६४ झाली आहे, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. आता एकूण मृत्यू ३५४ झाले आहेत. जिल्ह्यात ५,०६१ जण कोरोनामुक्त झाले. सध्या ३,०४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी २२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

ही बातमी पण वाचा : सांगलीत रविवारी कोरोनाचे दोन बळी

बीड जिल्ह्यात येवलवाडी, बेनसूर व उमापूर येथील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात नवे ५ रुग्ण सापडले आहेत. जालना शहरात बरवार गल्लीतील ४५ वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना, तर वाल्मीकनगरातील ५९ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला.

मराठवाड्यात १३ बळींची नोंद गेवराईत संशयिताची आत्महत्या, अहवाल आला निगेटिव्ह गेवराईत एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका संशयित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्याने गळफास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER