लोटेतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २०४ जणांची होणार चाचणी

Coronavirus

रत्नागिरी/प्रतिनिधी : लोटे एमआयडीसीतल्या पाच कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच चिपळुणातून औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान बाधितांच्या नातेवाईकांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. या लोकांच्या संपर्कातील २०४ लोकांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले आहेत. लोटे एमआयडीसीमधील बड्या कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अन्य कामगारांनाही कोरोना झाल्याचे पुढे येत आहे. यामुळे खेड आणि चिपळुणात चिंतेचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER