सातारा नगरपालिकेची किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर होणार विशेष सभा

Satara ZP

सातारा : सातारा नगरपालिकेच्या विशेष सभा किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर होणार आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून साताऱ्याची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती. त्यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर झाला होता. 12 जानेवारीला राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने पालिका सभेचे आयोजन किल्ल्यावर करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेस केल्या होत्या. यानुसार या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर झाला होता. हा दिवस शिवप्रेमी स्वाभिमान दिन म्हणून साजरा करतात. या दिनाच्या औचित्याने पालिकेच्या विशेष सभेचे आयोजन या दिवशी आयोजन किल्ल्यावर करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे यांनी पालिकेस केल्या व त्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. साताऱ्यात शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दर वर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो, तर गेल्या आठ वर्षांपासून सातारा स्वाभिमान दिन 12 जानेवारीला आयोजिण्यात येतो. हद्दवाढीनंतर किल्ले अजिंक्‍यताऱ्याचा समावेश पालिकेत झाला आहे. यामुळे या वेळी होणारी पालिकेची विशेष सभा किल्ल्यावर घेण्यात येत असून, तसे आयोजन करणारी सातारा नगरपालिका राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER