शेतकरी आंदोलनावर लवकरच निघेल तोडगा – नरेंद्रसिंह तोमर

Narendra Singh Tomers-Farmers

नवी दिल्ली : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनौपचारीक पातळीवर चर्चा सुरू असून शेतकरी आंदोलनावर नवीन वर्षाच्या आधी तोडगा निघेल असे संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर ( Narendra Singh Tomar) यांनी दिले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यासाठी कधीही शेतकऱ्यांशी औपचारीक स्वरूपात पुन्हा चर्चा सुरू करण्याचीही सरकारची तयारी आहे. पण जे लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

विरोधीपक्षांवर आरोप

विरोधीपक्ष कृषी विषयक सुधारणांचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी विषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. शेतकऱ्यांना एमएसपी मिळेल याची लेखी ग्वाही द्यायला सरकार तयार आहे. मंडी पद्धतही कायमच राहील याचीही ग्वाही देण्यास सरकार तयार आहे, असे तोमर म्हणालेत.

आम्ही शेतकऱ्यांशी सुरू असलेली चर्चेची प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यास तयार आहोत, चर्चेचे मार्ग आम्ही बंद केलेले नाहीत. या विषयावर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो अशी सरकारची भूमिका आहे. औपचारीक चर्चेतून काही मार्ग निघत नाही असे दिसल्याने आम्ही अनौपचारीक मार्गाने चर्चा सुरू ठेवली असून त्यातून काही तरी मार्ग निघेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या संबंधात सुप्रिम कोर्टाच्या पुढील निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. आमच्या कायद्यातील प्रत्येक मुद्‌द्‌यांवर सविस्तर चर्चा झाली आणि या कायद्यात काहीं त्रुटी आहेत असे शेतकऱ्यांनी पटवून दिले तर कायद्यात आवश्‍यक त्या दुरूस्त्या करण्यासही सरकार तयार आहे असे तोमर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER