राज्यात किंचितसा दिलासा, आज दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांची करोनावर मात

Maharashtra Corona Updates

मुंबई :- कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढत असून, दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. मागील काही दिवस सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत होते. मात्र आज दिवसभरात किंचितसा दिलासा मिळला आहे. आज आढळलेल्या नवीन करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांनी करोनावर मात केली असून, ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे.

याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९४ एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यात ५८ हजार २४५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,६४,७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button