काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा, मुलीची माहिती

Ahmed patel

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा झाली असल्याची माहिती त्यांची मुलगी मुमताज हिने दिली आहे. बुधवारी मुमताज हिने ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले की, गुरुग्राममधील रुग्णालयात तिच्या वडिलांची तब्येत गेल्या काही दिवसांत किंचित सुधारली आहे.

पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांनी आपल्या बहिणीचा हा ऑडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मुमताज म्हणाल्या, मी आज डॉक्टरांशी बोलले. माझ्या वडिलांची तब्येत थोडी सुधारली आहे. उपचार पूर्ण होण्यास अधिक वेळ लागेल. सर्व लोकांच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांबद्दल खूप आभार. त्यानंतर अहमद पटेल यांचा मुलगा फैसल यांनी रविवारी ट्विट केले की, “माझ्या कुटुंबाच्या वतीने आम्ही असे सांगू इच्छितो की काही आठवड्यांपूर्वी अहमद पटेल याना कोरोना विषाणूची लागण झाली होती. पुढील उपचारासाठी त्यांना गुरगावच्या मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे … ते लवकरच बरे व्हावे यासाठी आपण प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER