सहा दिवसांच्या बाळाचा कोरोनाविरुद्ध लढा

Baby Fights Coronavirus

औरंगाबाद :- शहरात सहा दिवसांच्या बाळाचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. प्रसूतीनंतर २४ तासांनी केलेल्या तपासणीत हे बाळ कोराेना निगेटिव्ह आढळून आले होते. मात्र पाचव्या दिवशी केलेल्या त्याच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भिसारवाडी येथील कोरोनाबाधित महिलेची २३ मे रोजी प्रसूती झाली. या महिलेने मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर २४ तासांनी केलेल्या कोराेना तपासणीमध्ये बाळ कोरोनामुक्त असल्याचे समोर आले. पंरतु जन्माच्या पाचव्या दिवशी केलेल्या तपासणीमध्ये ते कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आणि घाटीत एकच खळबळ उडाली. यामुळे आरोग्य यंत्रणेसमाेर या बाळाला कोरोनामुक्त करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

ही बातमी पण वाचा :  १ मिनिटांत कोरोनाचे निदान; ९० % अचूक !

घाटीतील नवजात शिशू विभागाकडून बाळावर उपचार सुरू आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी बायजीपुरा येथील कोरोनाबाधित महिलेची जिल्हा रुग्णालयात सिझर प्रसूती झाली होती. तेव्हा नवजात बाळ कोरोनामुक्त असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर घाटीत २८ कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली. यात एकाही बाळाला कोराेनाची लागण झाल्याचे आढळून आले नाही. परंतु पहिल्यांदाच प्रसूती झाल्यानंतर पाचव्या दिवशी बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. असे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले. सध्या या बाळामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जात असून बाळाला लागण कशी झाली याचाही अभ्यास केला जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER