अभिषेक बच्चनच्या मनमर्जियांची सिक्वेल येणार

manmarziya

अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) ‘धूम; चित्रपटांच्या सिक्वेल तयार झाल्या पण त्यात नेहमी खलनायकच भाव खाऊन गेला. अभिषेकला इन्स्पेक्टरच्या भूमिकेवरच समाधान मानावे लागले. त्याच्या ‘बंटी और बबली’ या हिट चित्रपटाचाही सिक्वेल तयार होतोय पण अभिषेकला त्यात घेतले नाही.

सुपरस्टार अमिताभ बच्चनचा मुलगा असूनही अभिषेक बच्चन म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. त्याने काही चित्रपटांमध्ये खरोखरच चांगला अभिनय केला होता. परंतु पित्याच्या इमेजखाली त्याची कामगिरी झाकोळली गेली. तरीही अभिषेक निराश झाला नाही आणि त्याने काम सुरुच ठेवले. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जिया’मध्ये त्याने खूपच चांगले काम केले होते. अभिषेकच्याच सुपरहिट मनमर्जिया चित्रपटाचाही आता सिक्वेल तयार केला जाणार आहे. मूळ चित्रपटात अभिषेकसोबत तापसी पन्नू होती आणि दोघांनी पति-पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिषेकच्या भूमिकेची प्रचंड प्रशंसा झाली होती. दिग्दर्शक अनुराग कश्यपने आता ‘मनमर्जिया’चा सिक्वेल बनवण्याची योजना आखली असून अभिषेक, तापसी आणि विकी कौशल सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय अभिषेक मणिरत्नम यांच्यासोबतही एक चित्रपट करणार आहे असे सांगितले जात आहे. एकूणच 2021 अभिषेकसाठी चांगले जाणार असे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER